आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजार बळावले:मनमाडकर फणफणले तापाने; रुग्णसंख्येत वाढ डेंग्यूसदृश आजाराचेे शेकडो रुग्ण

मनमाड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळी वातावरणामुळे साथीच्या आजाराचा फैलाव वाढला आहे. हिवताप, चिकनगुन्यासारखे आजार बळावले आहेत. शहरातील खासगी दवाखान्यासह शासकीय उपजिल्हा रुग्णालयातही सर्दी-ताप-खोकल्याचे शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत.

हवामानात बदल झाला आहे, त्यामुळे डोकेदुखी, ताप, सर्दी-खोकल्याने नागरिक बेजार झाले आहे. रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. यामध्ये वृद्ध व लहान मुलांना साथीच्या आजाराने चांगलेच ग्रासले आहे. होत असल्याचेही समोर आले आहे. पावसाळ्यात जलजन्य आजाराबरोबरच साथीच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे, पिण्याचे पाणी शक्यतो घ्यावे, डेंग्यू वाढू नये, यासाठी नागरिकांनी कुठेही, घराबाहेर, रस्त्यावर पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी, कोणताही त्रास अधिक काळ अंगावर काढू नये, रुग्णालयात जाऊन त्वरित उपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...