आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे ओव्हर ब्रीजवर शुक्रवारी (दि. १३) पहाटे पाच वाजता डंपर नादुरुस्त झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. पहाटेपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सुमारे १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटेपासून सुरू असलेली वाहतूक कोंडी सायंकाळी पाच वाजता सुरळीत झाल्याने सुमारे १० तास वाहनचालकांसह शहरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
शुक्रवारी पहाटे रेल्वे ओव्हरब्रीजवर मालेगावकडून येवल्याकडे जाणारा डंपर (एमएच १५ इक्यू ७०४०) हा भर रस्त्यात नादुरुस्त झाला. डंपरला रस्त्याच्या बाजूला घेता येणे शक्य नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासूनच एका बाजूने संथगतीने वाहतूक सुरू करण्यात आली.
मात्र, या मार्गावर अवजड वाहनांची संख्या मोठी असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे शहरात चहूबाजूने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. चांदवड-मनमाड तसेच नांदगाव-मनमाड या मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी येणारी वाहने, पानेवाडी तेल कंपन्यांची इंधन वाहतूक या सर्व परिस्थितीमुळे मालेगाव चौफुलीसह रेल्वे ओव्हरब्रीजवर जवळपास दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.