आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:मनमाडला आमदार चषक कबड्डी स्पर्धा

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे शुक्रवार (दि. ९) पासून आमदार चषक प्रौढ गट महिला व पुरुष जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धा होणार आहे. यासाठी ४८ पुरुष व १४ महिला संघ सहभागी होणार आहेत. यातून राज्य निवड स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे पुरुष महिला संघ निवडले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी दिली. यावेळी संयुक कार्यवाह सतिष सूर्यवंशी, महेंद्र वाघ, वाल्मीक बागूल उपस्थित होते.

आमदार सुहास कांदे यांच्या आमदार निधीतून आणि राजेंद्र पगारे यांच्या सहकार्याने या स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत ४८ पुरुष व १४ महिला संघ सहभाग घेणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन दि. ९ डिसेंबर राेजी होणार आहे.

सामने रोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हाेणार आहे. ६० पुरुष तर २० महिला सामने असे एकूण ८० सामन्यांचा थरार कबड्डीप्रेमींना बघावयास मिळणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतून एकूण २२ खेळाडूंची निवड होणार असून या २२ खेळाडूंमधून १२ खेळाडू प्रौढ गट महिला व पुरुष जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून निवडले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...