आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा भावात चढ -उतार दिसून आला. उन्हाळ लाल व सफेद कांद्याची २८३ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. उन्हाळ कांद्याला किमान ३००, कमाल १०७५ तर सरासरी ८०० रुपये क्विंटल भाव मिळाला. लाल कांद्याला किमान ५००, कमाल १९७६ तर सरासरी १५०० रुपये क्विंटल तर सफेद कांद्याला किमान ४००, किमान १२९८ सरासरी १००० रुपये क्विंटल असे भाव होते. उन्हाळ व सफेद कांद्याचे भाव स्थिर होते. लाल कांद्याच्या भावात १०० रुपयांची घसरण झाली.
मक्याची ११८ नग इतकी आवक होऊन किमान १९८३, कमाल २१०६ तर सरासरी २०४१ असे भाव होते. काही दिवसांत उन्हाळ कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहे. आज या कांद्याला सरासरी ८०० रुपये क्विंटल हा न परवडणारा भाव मिळत आहे. गेल्या हंगामात उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळाला नाही. त्यात वाढती मजुरी, मजुर टंचाई, महागड्या औषधांची फवारणीने शेकरी मेटाकुटीला आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.