आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही नद्यांना पूर:मनमाडला दाेन तास जाेरदार ; पांझण व रामगुळणा नद्यांना पूर

मनमाड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी मुसळधार पावसाने शहरवासीयांना झोडपून काढले. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. पांझण व रामगुळणा या दोन्ही नद्यांना पूर आला. नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी घुसले. नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू पाण्यावर तरंगत होत्या.विवेकानंदनगर नंबर २, नवीन नगरपालिकेच्या इमारतीमागील भाग संपूर्णपणे पाण्यात होता.

त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. प्रोफेसर कॉलनीजवळ आणि आठवडे बाजार व कॉलेजला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल या तीनही पुलांवरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.वीजपुरवठा खंडित झाला हाेता. या मुसळधार पावसामुळे शहराच्या उंचसखल भागात व रस्त्या रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले, उतारावर असलेल्या नागरी वस्त्यांमध्ये घरामध्ये पाणी घुसले. पावसामुळे गणपती विसर्जनाला व्यत्यय आला.

बातम्या आणखी आहेत...