आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डी स्पर्धा:मनमाडच्या भारतमाता, समता क्रीडा संघाला मिळाले अंतिम विजेतेपद; तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १६ संघ सहभागी

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महर्षी भगवान वाल्मीकी बॉइज क्रीडा मंडळ आयोजित नांदगाव तालुकापातळीवरील कबड्डी स्पर्धेत कुमार गटात भारतमाता क्रीडा मंडळ तर किशोर गटात समता क्रीडा मंडळ अंतिम विजेते ठरले. कबड्डी खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने जयभवानी व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष व जिल्हा कबड्डी असोचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या हस्ते झाले. तालुक्यातील १६ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. चुरशीच्या झालेल्या कबड्डी सामन्यांत कुमार गटात भारतमाता क्रीडा मंडळाने जयभवानी क्रीडा मंडळाचा पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकावले. तर किशोर गटात समता क्रीडा मंडळाने भारतमाता क्रीडा मंडळाचा पराभव करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, माजी नगरसेवक अमिनभाई पटेल, डॉ. रवींद्र मोरे, पर्बत बहोत, पप्पू पाटील, शेखर आहिरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. वाल्मीक बागूल यांनी पंचप्रमुख म्हणून तर राजेश निकुंभ, दत्तू जाधव, पीटर फेरो, विलास मोरे, अमोल विन्सनकर, केतन जाधव, अंकुश गवळी, अमोल कातकडे, भूषण दरगुडे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

महर्षी भगवान वाल्मीकी क्रीडा मंडळाचे भारत बहोत, संजय चावरीया, शरद बहोत, सोनू घोगले, विक्रांत बहोत, प्रशांत बहोत, मुन्ना चावरिया, श्रीकांत बहोत, अभिषेक बहोत, मुन्ना बगाडे, विकास चावरिया, क्षितिज बहोत, हर्षवर्धन बहोत, विवेक सोदे, संजित किर, लकी बगाडे, देव किर आदींनी स्पर्धा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

या स्पर्धेतून प्रत्येक संघाच्या तीन खेळाडूंची निवड करून त्यांना तज्ज्ञ कबड्डी प्रशिक्षकांमार्फत कबड्डी खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...