आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्रामीण पाेलिस दलातर्फे नामपूरला मॅरेथान

नामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणांनी समाज घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन नामपूर येथे आयोजित मॅरेथॉन प्रसंगी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नामपूर येथे मालेगाव तालुका, वडनेर खाकुर्डी, जायखेडा, सटाणा पोलिस ठाणे यांच्या वतीने मॅरेथान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले हाेते.

कार्यकमास अप्पर पोलिस अधीक्षक चंदकांत खांडवी, पोलिस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, नामपूर सरपंच रेखा पवार, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद सावंत, सटाणा पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, जायखेड्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, मालेगाव तालुका पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक हेमंत पाटील, वडनेर खाकुर्डीचे सहायक निरीक्षक देवेंद्र शिंदे, सटाणा पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक स्वप्निल कोळी आदी उपस्थित होते सकाळी सात वाजता उन्नती विद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मॅरेथानला प्रारंभ झाला. यात तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला हाेता. विजयी स्पर्धकांना जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.कार्यकमासाठी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली नामपूरचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे, सुनील पाटील, सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्य किरण सावंत, शरद पवार, नारायण सावंत, सचिन अहिरराव यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...