आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव:बाजार समिती; मनमाडला कांद्याला सरासरी 950 रुपये भाव

मनमाडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बाजार समितीमध्ये सोमवारी (दि. ६) उन्हाळ कांद्याची ३९५ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. कांद्याला किमान २००, कमाल १२८७ तर सरासरी ९५० रुपये क्विंटल असा भाव होता.

गेल्या काही दिवसांत कांद्याच्या बाजारभावात किंचित सुधारणा झाली असली तरी त्याचा शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. ६०० ते ७०० रुपये क्विंटल असणारा कांद्याचा भाव सध्या ९५० रुपये क्विंटलपर्यंत गेला असला तरी तो अपेक्षेच्या तुलनेत कमी आहे.