आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:सहकारी संस्थांसाठी उपाययोजना करायला हव्यात; सोसायटी हा गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरला पाहिजे

येवला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध सहकारी सोसायट्या गावाचा केंद्र बिंदू बनल्या नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे कर्ज वितरणाच्या पलीकडे जाऊन संस्थांनी आपला उद्देश साध्य करावा. उद्योग, व्यवसाय, व्यापाराचे आदर्श आपल्याला पुढच्या पिढी समोर ठेवावे आवाहन व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांनी यांनी केले. यावेळी शिंदे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून गावांचा विकास व्हावा हा सहकारी सोसायट्यांच्या मूळ उद्देश आहे. सद्याच्या परिस्थितीत सहकारी सोसायट्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून सहकाराचा उद्देश साध्य करावा. तसेच शासन स्तरावर देखील सहकारी संस्थांसाठी उपाययोजना करायला हव्यात असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सगळ्यांना सोबत घेऊन समृद्ध करणे हा सहकाराचा उद्देश आहे. आपण ज्या संस्थेसाठी काम करतो त्या संस्थेच्या प्रगती होण्यासाठी संचालकांनी काम करावे. ग्रामीण आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू बनवून आपल्या सोसायटीच्या कामाचा आदर्श निर्माण करावे. असे आवाहन प्रा.गणेश शिंदे यांनी यावेळी केले. प्रास्ताविक वसंत पवार यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून १ कोटी २० लाख रुपयांच्या धनादेशाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भाटगाव व सायगाव येथील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थी धनादेश वाटप करण्यात आले. येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे विविध कार्यकारी सोसायटी संचालकांचा सत्कार सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...