आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वैनतेय’त पर्यावरणपूरक गुढीपाडव्याचा संदेश; मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कडुनिंबाच्या राेपांचे वाटप

निफाड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडव्याचा सणाला कडुनिंबाला विशेष महत्त्व आहे. वाढते शहरीकरण व बेसुमार जंगलतोड यामुळे कडुनिंबाच्या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यावर उपाय म्हणून वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरात गुढीपाडव्यानिमित्त कडुनिंबाच्या रोपांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, विश्वस्त विश्वास कराड, मधुकर राऊत, मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे आदी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक गुढीचे पूजन करून विद्यार्थ्यांना कडुनिंबाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून नववर्षाच्या स्वागताची तयारी केली. शिक्षक गोरख सानप यांनी कडुनिंबाच्या झाडाची पाने, साल, लिंबोळ्या यांचे आयुर्वेदिक उपयोग सांगितले. किरण खैरनार यांनी गुढीपाडवा या सणाची माहिती दिली. नपरीक्षेत्र अधिकारी एन. एस. आखाडे, वनपाल एस. के. चितोडे, प्रदीप पवार, विक्रम वडघुले यांनी कडुनिंबाचे रोपे उपलब्ध करून दिली.

कडुनिंबाच्या रोपांची लागवड व संगोपन करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. ल. जि. उगावकर, सचिव रतन वडघुले, विश्वस्त राजेंद्र राठी, राजेश सोनी, किरण कापसे, ॲड. दिलीप वाघावकर, प्रभाकर कुयटे, नरेंद्र नांदे निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, केंद्रप्रमुख नीलेश शिंदे व पालकांनी कौतुक केले. संजय जाधव यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...