आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिन्नर-शिर्डी महामार्गावर मुसळगाव एमआयडीसी शिवारातील हॉटेल निमंत्रणसमोर एका कंटेनरने दोन दुचाकींना चिरडल्याची घटना मंगळवारी (दि. १४) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
बाबासाहेब पंढरीनाथ सोनवणे (५६, रा. कोपरगाव) हे दुचाकी (एमएच १७ बीएफ ९१२६) व संतोष बुधा गोडे (२४) व सुनील रामू गोडे (२३, दोघे रा. अकोले) हे दुचाकीने शिर्डीकडून सिन्नरकडे येत होते. मुसळगाव एमआयडीसीच्या पुढे समोरून येणाऱ्या कंटेनर (सीजी ०७ बीए ५५८७) ने दोन्ही दुचाकींना समोरून धडक दिली. यात सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील संंतोष व सुनील हेही गंभीर जखमी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.