आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे येथे जेएसपीएम व टीएसएसएम या महाविद्यालयांद्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेत येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संचलित श्री एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतनाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ‘मिनी ट्रॅक्टर’ या बहुपयोगी प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती प्राचार्य डॉ. विशाल वानखेडे यांनी दिली.
पुणे येथील जेएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाने दि. २८ फेब्रुवारी रोजी ‘शोध-२०२३’ या राष्ट्रीयस्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील सुमारे २२० महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातर्फे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाद्वारे ‘डिझाइन अँड फॅब्रिकेशन ऑफ मायक्रो हायब्रीड अॅग्रीकल्चर मशीन (मिनी ट्रॅक्टर)’ व ‘स्मार्ट इलेक्ट्रिक फोल्डिंग बायसिकल’ असे दोन प्रोजेक्ट पाठविण्यात आले होते.
स्पर्धेच्या प्रथम व द्वितीय फेरी परीक्षणानंतर औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षक यांनी ‘मिनी ट्रॅक्टर’ या प्रोजेक्टची निवड केली. या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे ३५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. हा बहुपयोगी प्रकल्प प्रतिक बुरकुल, श्रुतिका वाघ, भूषण गांगुर्डे, दुर्गेश गोसावी, सचिन गोसावी, अमन काद्री, गोकुळ गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी प्रा. जी. जे. पगार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला. या स्पर्धेत प्रा. एम. एस. भागवत यांनी मेंटर म्हणून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. विशाल वानखडे, उपप्राचार्य प्रा. एस. एच. गौडा, मेकॅनिकल विभागप्रमुख डी. व्ही. लोहार, कॉम्प्युटर विभागप्रमुख पी. आर. साळी, इलेक्ट्रॉनिक विभागप्रमुख एन. आर. ठाकरे, मेकॅनिकल विभागाचे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर डॉ. जी. डी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड, अजितकुमार सुराणा यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.