आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:औद्योगिक वसाहतप्रश्नी आज आमदार कोकाटेंची उद्योगमंत्र्यांसमवेत बैठक

सिन्नर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुसळगाव व माळेगाव येथील औद्योगिक वसाहती, गुळवंच-मुसळगाव शिवारातील रतन इंडिया सेझ व नव्याने होऊ घातलेल्या मापारवाडी येथील औद्योगिक वसाहतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार माणिकराव कोकाटे यांची मंगळवारी (दि. २२) सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

उद्योगमंत्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे होणाऱ्या बैठकीस आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह प्रधान सचिव, उद्योग विभाग, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, (व्ही.सी. द्वारे), नगरपालिकेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय केदार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग विभागाचे सहसचिव, मुख्य अभियंता, प्रादेशिक अधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल), निफाड व इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत शहराच्या पूर्व-पश्चिमेस असणाऱ्या दोन औद्योगिक वसाहती त्याचप्रमाणे नव्याने होऊ घातलेल्या मापारवाडी येथील औद्योगिक वसाहतीला आणि रतन इंडिया पाॅवर प्रकल्पास जोडणाऱ्या सिन्नर नगरपरिषद हद्दीतील बाह्यवळण रस्त्याबाबत, अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र मौजे मुसळगाव व गुळवंच ता. सिन्नर येथील प्रकल्पग्रस्तांना (पीएपी) विकसित भूखंड मिळणेबाबत व मुसळगाव ग्रामपंचायतीकरिता प्रतिदिन १२५० घनमीटर पाणी मिळणे या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार कोकाटे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...