आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदीवर असलेले अनधिकृत भोंगे काढण्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ४) शहर आणि परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. तसेच मनसे शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, मनमाड शहर रिपाइंतर्फे भोंग्यांना संरक्षण देऊन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची पोलिस यंत्रणेकडून पुरेपूर काळजी घेतली गेली. त्यादृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध कलमांद्वारे नोटिसादेखील बजावण्यात आल्या होत्या. रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगा त्रिभुवन, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, तालुकाध्यक्ष कैलास आहिरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
सहायक पोलिस निरीक्षक गौतम तायडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मनसेचे शहराध्यक्ष सचिन शिरूड यांच्यसह इतरही पाच जणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.