आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त करण्याची मागणी:चांदवडला मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; नऊ जणांना चावा

चांदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गुरुवारी (दि. १२) माेकाट कुत्र्यांनी नऊ जणांना चावा घेतल्याने या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सोमवार पेठेतील ग्रामस्थांनी चांदवडचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील सोमवार पेठ हे वर्दळीचे ठिकाण असून येथे दिवसा व रात्री मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात संचार आहे. रात्रीच्यावेळी खंडेराव मंदिर रोडकडे फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला व वृद्ध नागरिकांच्या अंगावर ही कुत्री धावून जातात. गुरुवारी चांदवड शहरातील रुचिता भरत कासलीवाल (४०), स्वरा अजय सोनवणे (६), नीलेश खंदारे (३५), ऋषिकेश सोनवणे (२२), रतन जाधव (५९), मिलिंद बनकर (६८), युक्ती बाफना (१२), रुबिनशा शहा (२८) व सखाराम जाधव (४३, वडबारे) या नऊ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेत ज‌खमी केले.

त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दोन दिवसांत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर मांगीलाल कासलीवाल, बाळासाहेब क्षत्रिय, रेवन क्षत्रिय, भरत कासलीवाल, योगेश सोनवणे, उत्तम व्यवहारे, अभिजित सोनवणे, भिकचंद व्यवहारे, सचिन गुजराथी, दीपक व्यवहारे, नीलेश खंदारे, श्रीनिवास सोनवणे, रंगनाथ सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...