आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:मालेगावात डास व माशांचा उच्छाद, स्वच्छता मोहीम न राबवल्यास आंदोलन; आम्ही मालेगावकर समितीचे उपयुक्तांना निवेदन

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात स्वच्छ्ता, औषध फवारणी वेळेवर होत नसल्याने व मोठ्या प्रमाणावर डास, माशा झाल्या आहेत. त्यामुळे ठिक ठिकाणी पडलेला कचरा गोळा करण्यात यावा, औषध फवारणी व धुरळणी नियमित करण्यात यावी, डुक्कर,कुत्रे व मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करण्यात यावा.

यासाठी तात्काळ विशेष स्वच्छता मोहीम राबवून सर्वत्र साफ सफाई करण्यात यावी, अन्यथा २१ एप्रिलपासून आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने दिला आहे.

आम्ही मालेगावकर समितीतर्फे उपायुक्त राजेंद्र खैरनार यांना निवेदन दिले व चर्चा केली. शहरात मोठ्या प्रमाणावर गटारी तुंबल्या आहेत. रोज रस्ते झाडले जात नाहीत. ठिक ठिकाणी कचरा पडलेला असतो. मोकळ्या भूखंडावर काटेरी झुडपे वाढलेली आहेत. औषध फवारणी व धुरळणी नियमित केली जात नाही, त्यामुळे डास मच्छर वाढले आहेत. माश्यांचे प्रमाण देखील वाढले असल्याने साथीचे आजार वाढत आहेत.

डुकरे, कुत्रे व मोकाट जनावरे यांचे देखील प्रमाण वाढले आसल्याने शहरात स्वच्छ्ता विभाग नेमका काय काम करतो असा प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला. शिष्टमंडळात निखिल पवार, अनिल निकम, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, कपिल डांगचे, अतुल महाजन, दीपक पाटील, नेवीलकुमार तिवारी, रोशन गांगुर्डे आदींचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...