आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:आईला कामावरून काढले; मुलांनी कंपनी व्यवस्थापकालाच संपवले

सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापकाचा कंपनीच्या गेटवरच चाकू व तलवारीने वार करीत खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ७) सकाळी घडली. आईला कामावरून काढून टाकल्याने मुलानेच हा बदला घेतल्याचे समोर येत आहे. घटनेबाबत अंबड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजेची वेळ, अंबड औद्योगिक वसाहतीतील गंगोत्रीसमोरील आहेर इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार निवृत्ती आहेर (५०, रा. महात्मानगर) हे आपल्या चारचाकी वाहनातून कामावर आले. कंपनीच्या गेटवर गाडी उभी करून उतरत असताना अगोदरच दबा धरून बसलेले तीन युवक थेट धावत येत आहेर यांच्यावर तलवार व चाकूने वार करू लागले. युवकांनी हल्ला केल्यावर आहेर यांना गंभीर जखमा झाल्याने ते खाली कोसळले.

या सर्व प्रकाराने झालेल्या आरडाओरडीने कंपनीतील काही कामगार बाहेर पळत आले. हल्ला करून युवक हातातील हत्यारे तेथेच टाकून दुचाकीवर पसार झाले. घटनेबाबत अंबड पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत तपास सूरू केला. आईला कामावरून काढून टाकल्याने घेतला बदला : ज्या तरुणाने हा खून केला त्याच्या आईला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याचा राग आल्याने त्याने साथीदारांच्या मदतीने कंपनी व्यवस्थापकाचा बदला घेण्यासाठी थेट हल्ला करीत त्याचा खून केला.

बातम्या आणखी आहेत...