आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांचा राबता:सोयगाव डीके चौकात गुन्हेगारांचा वावर, पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणानाका अॅरोमा चित्रपटगृहाशेजारील पोलिस चौकीची डागडुजी करून ती सुरू करण्यात यावी. सोयगाव डीके चौकात मोकळ्या जागेवर रात्री मद्य पिणाऱ्यांची संख्या वाढली असून गुन्हेगारांचा राबता सुरू आहे. त्यामुळे या भागात महिला व वृद्धांना त्रास वाढला आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नियुक्त करावा, अशी मागणी सोयगावचे माजी सरपंच बापू बच्छाव यांनी केली आहे.

त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मागणीचे निवेदन पाठवले आहे. सोयगाव ग्रामपंचायतीतर्फे २० वर्षांपूर्वी अॅरोमा चित्रपटगृहाजवळ पोलिस चौकी बांधण्यात आली होती. ही चौकी सध्या बंद असल्याने या भागात गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांना आळा राहिला नाही. या भागात मोठी व्यापारी बाजारपेठ, दवाखाने, रहिवासी वसाहती आहेत. नागरिक वाइन शॉपजवळ, सटाणारोडलगत उघड्यावर मद्य पिऊन रस्त्यावर नेहमी धांगडधिंगा करतात. त्यामुळे पोलिस चौकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी बच्छाव यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...