आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदीप:महावितरण व पं. स.च्या चुकीमुळे ठेंगोड्यात ८ दिवसांपासून पथदीप बंद ; तांत्रिक अडचणीमुळे थकबाकी जैसे थे

ठेंगोडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या चुकीमुळे ठेंगोड्यातील पथदीप आठ दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पथदीपांच्या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी बागलाण पंचायत समितीला ७७ लाख रुपयांना निधी प्राप्त झाला होता. पंचायत समितीनेही महावितरणच्या मागणीनुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पथदीपांची थकबाकी भरली. मात्र, महावितरणने ठेंगोडा गाव बागलाण तालुक्यात येत असतानाही त्याची ‌थकबाकी देवळा तालुक्यात दाखवली, परिणामी देवळा पंचायत समितीने ठेंगोड्याच्या पथदीपांची थकबाकी न भरल्याने अद्यापही गावातील पथदीप बंद आहेत. ठेंगोडा गाव बागलाण तालुक्यात येत असले तरी महावितरणच्या कळवण विभागाला गाव जोडण्यात आले आहे. या विभागानुसार गावाचे नाव देवळा तालुक्यात येते. त्यामुळे पथदीप थकबाकी मागणीसाठी गावाचे नाव देवळा तालुक्याच्या यादीत येते तर शासनाकडून वीजबिलासाठी येणारा निधी हा तालुक्यानुसार बागलाण पंचायत समितीला वितरीत होतो. त्यामुळे महावितरणने थकबाकी मागणी यादी करताना तालुक्यातील गावांनुसार यादी करणे गरजेचे असताना विभागानुसार आलेली यादी ‘जैसे थे’ पंचायत समितीला पाठविण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी चूक लक्षात येताच सदर यादी दुरुस्ती करून त्या-त्या पंचायत समितीला पाठविणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता यादी पाठविण्यात आल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...