आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखल:महामार्गावर सर्वत्र चिखल; अवैध माती वाहतुकीमुळे मुंबई-आग्रा महामार्गावर माणिकखांबजवळ चिखल

घोटी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यातील माणिकखांबजवळ दारणा धरणाच्या बॅकवॉटरमधून अवैध माती वाहतूक सुरू असून माती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे मुंबई-आग्रा महामार्गावर सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे. परिणामी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याची तक्रार वाहनचालकांसह माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली आहे.

धरणाच्या बॅकवॉटरमधून काळ्या मातीची अवैध वाहतूक होत आहे. या मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चाकाला लागून आलेली तसेच वाहनातून पडणारी माती महामार्गावर पसरत आहे. त्यातच पाऊस पडल्याने चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनाने ब्रेक मारल्यास ती घसरून अपघात वाढले आहेत. त्यामुळे येथील माती वाहतूक बंद करावी, अशी मागणी प्रवासी करत आहे. या मार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्याने थोडाही पाऊस आला, तर चिखलात वाहने अडकून मार्गावर वारंवार वाहनांच्या रांगा लागत आहेत.

वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. वाहनधारकांना वाहने चालवताना या मार्गावरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा मार्ग अपघात प्रवण झाला आहे. त्वरित या रस्त्याची स्वच्छता करावी किंवा एक बाजूने वाहतूक सुरू करावी तसेच अवैध माती वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...