आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महापालिका प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध; हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी 20 जूनपर्यंत मुदत

मालेगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली असून पालिका मुख्यालय व सर्व प्रभाग कार्यालयात यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादी प्रसिद्ध केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच प्रशासनाने हरकती व सूचना स्वीकारण्यास प्रारंभ केला असून दि. २० जूनपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे.

महापालिका विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. मात्र पालिका प्रशासकपदी आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित नसला तरी प्रशासनाच्या निवडणूक शाखेतर्फे तयारी सुरू केली आहे.

निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रभागांची प्रारूप यादी (सीमरेषांसह) प्रसिद्ध करण्याच्या सूचना झाल्या आहेत. त्यानुसार पालिकेने सर्व प्रभाग कार्यालये, पालिका मुख्यालय, निवडणूक शाखा व पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर बुधवारी यादी प्रसिद्ध केली आहे.

बातम्या आणखी आहेत...