आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा‎:अभिरूप युवा संसदेत नाईक‎ महाविद्यालयाचा संघ प्रथम‎

दिंडोरी‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव‎ नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला‎ आणि वाणिज्य महाविद्यालय‎ दिंडोरी येथील विद्यार्थी विकास‎ मंडळातील विद्यार्थ्यांनी अभिरूप‎ संसदेत प्रथम क्रमांक मिळविला.‎ क्रांतिवीर वसंतराव नारायणराव‎ नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे‎ नाशिक कला वाणिज्य आणि‎ विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी‎ विकास मंडळ आणि सावित्रीबाई‎ फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त‎ विद्यमाने नुकतीच अभिरूप‎ संसदेच्या कामकाजाची स्पर्धा‎ घेण्यात आली. त्या स्पर्धेत के. व्ही.‎ एन. नाईक महाविद्यालय दिंडोरी‎ येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक‎ मिळविला.

या स्पर्धेत साक्षी शरद‎ वडजे, पौर्णिमा संजय शेळके,‎ अर्चना सुरेश गावंडे, गणेश‎ धोंडीराम शिंदे , संकेत भाऊसाहेब‎ अपसुंदे, युवराज कांतिलाल‎ गायकवाड, समाधान सोपान थेटे,‎ लक्ष्मण गुलाब गुंजाळ, देवीदास‎ माधव चौधरी, सुनील नीलकंठ‎ महाले, यादव तानाजी चौधरी,‎ माधव योगिराज गवळी या‎ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.‎ विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.‎ प्रल्हाद दुधाणे, अमोल गाढे यांनी‎ मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना‎ प्रमाणपत्र व महाविद्यालयास ट्रॉफी‎ देण्यात आली. विद्यार्थ्यांचे प्राचार्य‎ डॉ. राजेंद्र सांगळे उपप्राचार्य डॉ.‎ सुनील उगले, डॉ. रूपाली शिंदे‎ आदीनी अभिनंदन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...