आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव:आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ‘नाम’तर्फे मदत; तालुक्यातील 15 कुटुंबांना 25 हजार रुपयांची मदत

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लाजिरवाणी बाब असून अशा कठीण परिस्थितीत आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून नाम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.

या संस्थेने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाम फाउंडेशनद्वारे आर्थिक सहयोग म्हणून शिलाई मशीन तसेच शेळी वाटप व शेवया मशिन वाटप करण्यात आले आहे. नुकताच मालेगाव तालुक्यातील आत्महत्या झालेल्या कुटुंबातील १५ परिवारांना नाम फाउंडेशनच्या वतीने व फाउंडेशनचे विदर्भ खान्देश प्रमुख हरीश इथापे यांच्या पुढाकारातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना २५ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. नामचे वाशीम जिल्हा समन्वयक डॉ. आश्विन सुरूशे यांच्या पुढाकारातून धनादेश वाटपाचा कार्यक्रम मालेगाव तहसीलच्या सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाला तहसीलदार रवी काळे, कृषी अधिकारी सावंत, नायब तहसीलदार दिनकर केंद्रे, डॉ. सुनीता सोळंके, गजानन बोरचाटे, अमोल बैस यांच्यासह आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुरोशे यांनी तर आभार मंगेश गवळी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...