आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेत एकूण ९६.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागला. शाखेत श्रेया दिनेश जोशी ६०० पैकी ५२८ गुण मिळवत प्रथम क्रमांक, साक्षी ननावरेने ६०० पैकी ५१७ गुण मिळवत द्वितीय तर लौकिक लोढाने ५१३ गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेचा निकाल ९९.५९ टक्के लागला.
शाखेत तेजल मधने ६०० पैकी ५०८ गुण मिळवत प्रथम, तेजस्विनी गितेने ५०३ गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर कुणाल जितेंद्र गुप्ताने ४९३ गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. कला शाखेतील ९२.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्ञानेश्वर थोरात ५१४ गुण मिळवत प्रथम, शुभम खैरनार ४८७ गुण मिळवत द्वितीय व शुभम शिंदेने ४७३ गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.