आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल जाहीर:नांदगावी सर्वच जागांवर विजय मिळविल्याचा दावा

नांदगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. त्यात हिसवळ बुद्रुक येथे सरपंच पदासाठी चुरशीची निवडणूक हाेऊन शांताराम पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश पवार यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. त्यांना अनुक्रमे ६६२ आणि ६६० मते मिळाली. मूळडोंगरी गावातील लढत लक्षवेधी ठरली. येथे जनाबाई सुरेश पवार यांनी अमोल नावंदर यांचा पराभव करत परिवर्तन घडवून आणले.

या गावातील मतदार कामानिमित्त राज्यातील कानाकोपऱ्यात विखुरला असल्याने येथील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मतदारांना आणण्यासाठी मोठी शक्ती खर्च केली होती. ऑइल कंपन्यांमुळे जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणारी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या नागापूर ग्रामपंचायतीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांनी रघुनाथ सोमासे यांचा पराभव करत सरपंचपद आपल्याकडे खेचून आणले.

तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आल्यावर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सर्व ठिकाणी आमच्या पक्षाशी संबंधित उमेदवार निवडून आल्याचा दावा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या वतीने ९ ठिकाणी महाविकास आघाडी प्रणीत उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला आहे.

सरपंचपदाचे निवडून आलेले उमेदवार
तळवाडे : शीतल निकम (९०५)
लक्ष्मीनगर : मीराबाई शंकर उगले (५३२)
मूळडोंगरी : जनाबाई सुरेश पवार
हिरेनगर : मंगला श्रावण बिन्नर (२८५)
भारडी : अनिता अशोक मार्कंड
हिसवळ बुद्रुक : शांताराम विठ्ठल पवार
धोटाणे खुर्द : शरद अशोक काळे
धनेर : मनीषा सुभाष वाघ (३५२)
लोढरे : ज्योती प्रमोद निकम
नागापूर : राजेंद्र पवार
बोयेगाव : बबन शेरमाळे
पिंपरखेड : मंजूषा जीवन गरुड
कसाबखेडा : सुनीता कांतिलाल चव्हाण अविरोध
शास्त्रीनगर : भिका बिन्नर अविरोध
नवसारी : अशोक व्हर्गळ अविरोध

बातम्या आणखी आहेत...