आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक मर्चंट को-ऑपरेटीव्ह बँकेला ६३ वर्षांची समृद्ध परंपरा आहे. बँकेने बँकिंग क्षेत्रात भरीव कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन बॅंकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी केले. येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात झालेल्या ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उद्योजक हेमंत नाईक, शिवदास डागा, मनोज भंडारी, प्रमोद चोथवे आदी उपस्थित होते.
यावेळी वाहनकर्ज, गृह कर्ज, पीओएस मशिनचे वितरण करण्यात आले. धात्रक म्हणाले की, नामको बँकेने ग्राहकांच्या हिताला प्राध्यान्य देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचे काम केले आहे. आरोग्यासाठी नामको चॅरिटेबल हस्पिटल उभारून कर्करोगाच्या तसेच असाध्य रोगावर रुग्णांसाठी अत्यल्प दारात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेला प्रशासकीय राजवटीत वाईट दिवस आले.त्यावेळी बँक डबघाईला आली. परंतु नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून दिल्याचे सांगितले. पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे यांनी नामको बँकेने केलेल्या नेत्रदीपक कामाचे कौतुक केले.
मेळाव्यास सुनील हांडे, अशोक घुमरे, गणेश माळी, सुधीर वाईकर, सुमित कासट, विकी खालकर, दत्ता हांडे, संतोष धाडीवाल, प्रकाश दायमा, हरीश लोढा, सुभाष नहार, विठ्ठल उगले, विलास साने, पन्नालाल शाह, सिन्नर शाखेच्या सल्लागार इंदुमती कोकाटे, माणिक रायजादे, नामदेव काकड, रवी गुजराथी, अनिल सरवार, डॉ.महावीर खिंवसरा, श्यामसुंदर झळके, माणिक सपकाळे, कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित, नरेंद्र पवार, प्रफुल्ल संचेती, सुभाष काळे, गोवर्धन पतसंस्थेचे रामनाथ डावरे आदी उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक पूजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.