आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांचा आक्रोश:उकळत्या तेलाच्या कढईत पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत, 20 दिवस मृत्यूशी दिली झुंज; अखेर ठरली अपयशी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका 6 वर्षीय चिमुकलीचा उकळत्या तेलाच्या कढईत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भाजल्यामुळे चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 20 दिवस मृत्यूशी झुंज देऊन अखेर चिमुकलीचा करुण अंत झाला, आणि आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या लखमापूर येथे ही घटना घडली आहे. 22 फेब्रुवारी रोजी चिमुकली उकळत्या तेलाच्या कढईत पडली होती. त्यानंतर लगोलग तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. 20 दिवसांनंतर तिचा जीव गेला. मात्र भाजल्यामुळे या काळात तिला प्रचंड वेदना होत होत्या.

भाजल्यावर मोठ्यांना देखील त्या वेदना सहन होत नाहीत. ही तर 6 वर्षांची चिमुकली होती. तिला होत असलेल्या वेदना पाहून तिच्या पालकांना देखील तितक्याच वेदना होत होत्या. ही घटना नेमकी घडली कशी याबाबत जाणून घेऊया.

अशी घडली घटना

नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहराजवळील लखमापूर येथे ही 6 वर्षांची चिमुरडी आपल्या कुटुंबासोबत राहत असे. 22 फेब्रुवारीला सायंकाळी तिच्या घरी मोठ्या कढईत शेव बनवली जात होती. यावेळी तिथे खेळत असताना चिमुरडी उकळत्या तेलाच्या कढईत पडली. यात ती गंभीर जखमी झाली.

उपचारात कसर सोडली नाही

चिमुकलीला यावेळी तातडीने लखमापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. लखमापूर रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या खाजगी रुग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यानंतर तिला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना 13 मार्चला तिचा मृत्यू झाला.