आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:राष्ट्रवादीची विचारधारा, ध्येयधोरणे सामान्यांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध; शरद युवा संवाद यात्रेत युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचे प्रतिपादन

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत राष्ट्रवादीची विचारधारा आणि ध्येयधोरणे पोहचवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले. सिन्नर येथे आयोजित शरद युवा संवाद यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या सिमंतिनी कोकाटे होत्या. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, दिनेश धात्रक, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, महिला तालुकाध्यक्ष मंगल कुऱ्हाडे, मालती भोळे, सुदाम बोडके, हर्षल देशमुख, सोमनाथ भिसे, प्रमोद सांगळे, राजाराम मुंगसे, बाजीराव बोडके, सुरेश सानप, संदीप भालेराव आदी होते.

मनसे ही मोदी नकलाकार सेना असून ती भाजपची सी टीम आहे. प्रचंड महागाई भडकली असताना केंद्रीय यंत्रणेना हाताशी धरून दडपशाहीचे राजकारण महाराष्ट्रात केंद्र सरकार करत आहे. आणि अशाही परिस्थितीत शरद पवार आणि राष्ट्रवादी फक्त विकासासाठी कटिबद्ध आहे म्हणून तर माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून इंडिया बुल्ससारखी कंपनी या ठिकाणी पुनर्जीवित होत आहे. या माध्यमातून २५ हजार युवकांना रोजगार निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन शहराध्यक्ष सुभाष कुंभार केले. सौरभ नाठे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अजय गोजरे, प्रवीण जगताप, योगेश घोटेकर, अक्षय उगले, योगेश आव्हाड, शक्ती उगले, सुरेश शिंदे, अजय हुळहुळे, रामभाऊ लोणारे, दीपक जगताप, उमेश गायकवाड, सिद्धार्थ गिते, धीरज मुठाळ, दर्शन कासट, रूपेश शिंदे, शिवम म्हस्के, महेश पगार, जुनेद शेख, सागर वाणी, गोपी साबळे, श्रीराम शिरोळे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...