आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतमहोत्सवी वर्ष:निसर्गोपचारतज्ज्ञ स्वागत तोडकर यांचे सोमवारी सिन्नरला व्याख्यान

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ स्वागत तोडकर यांचे सोमवारी (दि. २६) सायंकाळी सहा वाजता मातोश्री नर्मदा लॉन्सवर व्याख्यान होणार आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे व्याख्यान होणार असून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेने व्याख्यान प्रायोजित केले आहे.

व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे यांनी पत्रकार परिषदेत केले. उपाध्यक्ष नरेंद्र वैद्य, संचालक मनीष गुजराथी, सागर गुजर, जितेंद्र जगताप, विलास पाटील, प्रज्ञा देशपांडे, निर्मला खिंवसरा आदी उपस्थित होते. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयाच्या वतीने दर महिन्याला विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भगत, सांगळे यांनी दिली. नागरिकांनी व्याख्यानास येताना पेन, वही सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...