आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:वासाळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा; सरपंचपदी कोरडे

इगतपुरी, घोटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वासाळी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी सुनीता कोरडे यांची निवड करण्यात आली. तर ग्रामपंचायत सदस्यपदी एकनाथ गणपत खादे, सखुबाई संतोष कोरडे, अनुसया मारुती खादे, बाळू नामदेव कचरे, भरत पांडुरंग कोरडे, ताराबाई भिका झोले, भरत हरी जाधव, सुगंधा कैलास जाखेरे, मोनिका मुकेश भालेराव निवडून आले. वासाळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला.

दरम्यान मतमोजणी प्रसंगी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ च्या सदस्य पदाच्या उमेदवार प्रतिभा कचरे आणि मोनिका भालेराव यांना २३९ समसमान मते पडली. कस्तुरी वैभव बोरकर या शालेय मुलीने चिठ्ठी काढली असता त्यात मोनिका भालेराव या विजयी झाल्या. विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...