आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उ‌पक्रम:मनमाड -नांदगाव रोडवर भारत दूरसंचार निगम कार्यालयाजवळ; आमदार आपल्या दारी उ‌पक्रमात पहिल्या दिवशी 172 तक्रारी प्राप्त

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याद्वारे जनतेच्या प्रत्येक तक्रार आणि अडचणींचे निवारण करण्याचा निर्धार शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या उपक्रमात पहिल्याच दिवशी १७२ नागरिकांच्या तक्रारी दाखल झाल्या. शिवसेना आमदार आपल्या दारी या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी (दि.६) मनमाड -नांदगाव रोडवर भारत दूरसंचार निगम कार्यालयाजवळ झाला. ज्या ठिकाणी शासनाकडून तक्रार सोडवणे शक्य नाही, त्याठिकाणी शिवसेना स्वखर्चाने ही तक्रार सोडवेल. मग रस्त्याचा प्रश्न असो, पथदीपांचा प्रश्न असो की अन्य काही. शिवाय रेशन कार्डाची समस्याही गंभीर आहे. ही समस्याही सोडवली जाईल. सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी केला जाईल, असे आमदार कांदे यांनी सांगितले.

हा उपक्रम चांगला असून या संकल्पनेतून जनतेच्या समस्या सुटण्यास मदत होईल असे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी सांगितले. पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सचिनकुमार पटेल यांनी उपक्रमास सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. व्यासपिठावर विविध शासकीय विभागाचे अधिकारी, अंजूम कांदे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अल्ताफ खान, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन नितीन पाटील व अनिल दराडे यांनी केले. गटविकास अधिकारी वर्ग, प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे खैरनार, नांदगाव तालुका कृषी विभाग, मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. जगताप, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी नितनवरे, महावितरणचे शहर अभियंता एस.बी.शिंदे यांच्याकडे नागरिकांनी लेखी स्वरूपात विविध तक्रारी मांडल्या. शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी प्रास्ताविक केले.

उद्घाटनाच्या सत्रानंतर शहरांतील बुरकुलवाडी, माऊली नगर, किर्ती नगर, कोतवाल नगर, सिकंदर नगर, डॉ.आंबेडकर नगर, तिरंगा नगर, गौतम नगर या भागांतील नागरिकांनी प्रत्यक्ष आमदारांसमोर नगरपालिका व नागरी सुविधा, रेशनकार्ड, हसूल, पथदिप, रस्ता, पाणी पुरवठा आदी समस्या लेखी व तोंडी स्वरूपात मांडल्या.

बातम्या आणखी आहेत...