आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा‎:मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात‎ प्रतिबंधात्मक उपाययाेजनांची गरज‎

मालेगाव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या अपघातांमुळे मुंबई-आग्रा‎ राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी‎ धाेकादायक ठरत आहे. संभाव्य‎ अपघातांना आळा घालण्यासाठी‎ अपघात प्रतिबंधात्मक उपाययाेजना‎ कराव्यात अशी मागणी माजी‎ आमदार आसिफ शेख यांनी केंद्रीय‎ रस्ते व परिवहन वाहतूकमंत्री नितीन‎ गडकरी यांच्याकडे केली.‎ शेख यांनी मंगळवारी दिल्लीत‎ गडकरी यांची भेट घेत चर्चा करुन‎ मागणीचे निवेदन दिले. राष्ट्रीय‎ महामार्ग क्रमांक ३ हा मालेगाव‎ शहराजवळून जाताे. महामार्गाच्या‎ दाेन्ही बाजूला यंत्रमाग कामगारांच्या‎ दाट नागरी वस्त्या आहेत.

या‎ महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र‎ परिसरात भुयारी मार्ग, पथदीप, झेब्रा‎ क्राॅसिंग पट्टे व गतिराेधके नाहीत.‎ परिणामी ठराविक ठिकाणी नियमित‎ अपघात घडत असतात. दाेन्ही‎ वस्त्यांमधील नागरिकांना जीव‎ मुठीत धरून महामार्ग ओलांडावा‎ लागताे. वाढते अपघात पहाता‎ भुयारी मार्ग, सर्व्हिसराेड,‎ दिशादर्शक फलके, हायमास्ट दिवे,‎ वाहतूक पाेलिसांनी नेमणूक आदी‎ अपघात प्रतिबंधात्मक उपाययाेजना‎ तातडीने करणे गरजेचे असल्याचे‎ शेख यांनी मंत्री गडकरी यांच्या‎ लक्षात आणून दिले. या मागणीची‎ दखल घेत गडकरी यांनी स्वीय‎ सचिवांना बाेलावून कार्यवाहीचे‎ आदेश दिले आहेत. यादरम्यान शेख‎ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष‎ शरद पवार यांचीही भेट घेतली.‎

बातम्या आणखी आहेत...