आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच परिषद:अधिकारी-सरपंचांमध्ये ग्रामीण विकासासाठी समन्वय गरजेचा; ग्राम समस्या, शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘एमआयटी, पुणे’ शिक्षण संस्था समूहाच्या ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत स्थापित एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसद’ व नाशिक विभागीय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. ११) तालुका सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले होते.

पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित सरपंच संसदेत तालुक्यातील सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे, बाळासाहेब लोखंडे, नायब तहसीलदार पंकजा मगर व गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी सरपंचांनी प्रातिनिधिक स्वरूपात सादर केलेल्या तालुक्यातील ज्वलंत ग्रामविकास विषयक समस्यांचे निराकरण करून शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी ‘सरपंच संसद’ उपक्रमामागील संयोजन भूमिका सांगितली. सहसमन्वयक प्रकाश महाले यांनी प्रास्ताविक केले. तालुका समन्वयक वाल्मिक सांगळे यांनी प्रारंभी प्रमुख वक्ते व सरपंचांचे स्वागत केले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड, सहसमन्वयक बापूराव चव्हाण व सहसंघटक योगेश्वर ठोंबरे आदी व्यासपीठावर होते.माजी सभापती प्रवीण गायकवाड यांनी तालुक्यातील ग्रामविकासविषयक विविध ज्वलंत प्रश्नांची अभ्यासपूर्वक मांडणी केली. गुजरखेडेचे सरपंच बापूराव चव्हाण, अंदरसूलच्या सरपंच सविता जगताप, निळखेडेचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश कदम व उंदीरवाडीचे सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी सरपंच संसदेत तालुक्यातील ग्रामविकास व महसूलविषयक असणाऱ्या विविध, ज्वलंत व प्रातिनिधिक समस्यांचे अभ्यासपूर्वक सादरीकरण केले.

ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाशी निगडित विविध ज्वलंत प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व सरपंच यांच्यात विधायक संवाद घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सरपंच संसदे’चे मुखेड गणाचे समन्वयक नानासाहेब सांगळे (सरपंच - सत्यगाव), चिंचोडी गणाचे समन्वयक सचिन आहेर (सरपंच - पारेगाव), नागडे गणाचे समन्वयक गणेश कदम (सरपंच - खामगाव), अंदरसूल गणाचे समन्वयक जगन्नाथ मोरे (सरपंच - खरवंडी), राजापूर गणाचे समन्वयक दत्ता सानप (सरपंच - राजापूर), सायगाव गणाचे समन्वयक बाजीराव जाधव (सरपंच - अंगुलगाव), नगरसूल गणाचे समन्वयक दत्ताजी देवरे (सरपंच - आहेरवाडी), सावरगाव गणाचे समन्वयक बापूसाहेब गायकवाड (सरपंच - अनकुटे), पाटोदा गणाचे समन्वयक ज्ञानेश्वर बुले (सरपंच - शिरसगाव लौकी ) व धुळगाव गणाचे समन्वयक मंगेश जांभळे (सरपंच - विसापूर) यांच्यासह सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...