आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या पूर्वजांनी धर्मनिरपेक्षतेच्या आधारे जनतेची सेवा केली आहे. ताेच धर्म पुढे नेण्याचे काम आपण करत आहाेत. शहराचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर जातीयवादी शक्तींपासून शहराला सुरक्षित ठेवण्याची गरज असल्याचे ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांनी सांगितले. हिरे यांनी जुना आग्रा राेडवरील जनता दल कार्यालयास नुकतीच भेट दिली. मनपाच्या माजी विराेधी पक्षनेत्या शान-ए-हिंद व माजी नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांच्याशी चर्चा केली. शहर हिताच्या रखडलेल्या प्रकल्पांविषयी चिंता व्यक्त करत त्यांनी जनता दलच्या विकास कामांसंदर्भातील आक्रमक भूमिकेचे काैतूक केले.
शहर विकासासाठी नेहमी सहकार्य राहिल, असे आश्वासन हिरे यांनी दिले. शान यांनी माजी मंत्री निहाल अहमद यांच्या समाजवादी विचारांचे पालन करून राजकीय वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. मुस्तकिम डिग्निटी यांनी जनता दलच्या माध्यमातून सुरु जनसेवेची माहिती दिली. नागरिकांना शासकीय कामांसाठी आवश्यक कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करुन दिली जात असल्याचे सांगितले. हिरे यांनी या केंद्राला भेट देत जनता दलच्या कामाची प्रसंशा केली. याप्रसंगी जनता दलचे उपाध्यक्ष रशीद येवलेवाले, प्रा. रिजवान खान, खुर्शीद काबूल, अब्दुल बाकी राशनवाला, साेहेल अब्दुल करीम, अबू शाेएब निहाली, इम्रान बाकी, अकमल अन्सारी आदी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.