आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मातांसाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता आर. बाफना यांनी दिली. आजच्या स्पर्धेच्या युगात आपणास इंग्रजी बोलता येणे क्रमप्राप्त झाले आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठीसुद्धा इंग्रजी भाषा अवगत असणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने वैशाली प्रदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आपल्याला जीवनात नवीन उंची गाठायची असेल तर इंग्रजी बोलता येणे क्रमप्राप्त आहे, असे प्रतिपादन आपल्या मनोगतातून प्रमुख अतिथींनी व्यक्त केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मातांसाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्सची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या मातांनी आमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे, असे मत व्यक्त करत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलीझाड, महावीर पारख यांनी कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.