आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता:नवीन बसस्थानक ते दरेगाव चाैफुली रस्ता दाेन दिवस बंद

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील दरेगाव शिवारात मुस्लिम धर्मियांचा १५ व १६ डिसेंबरला दाेन दिवसीय इस्तेमा कार्यक्रम हाेत आहे. या कार्यक्रमामुळे शहरांतर्गत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नवीन बसस्थानक ते दरेगाव चाैफुली दरम्यानचा जूना आग्रा राेड दाेन दिवस पूर्णत: वाहतुकीस बंद राहिल. या मार्गाने फक्त इस्तेमासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक माेहारे यांनी दिली.

इस्तेमासाठी भाविकांची माेठी गर्दी हाेणार आहे. ही गर्दी लक्षात घेता वाहतूक काेंडी हाेवू नये म्हणून वाहतूक मार्गात बदल केला आहे. माल वाहतूक करणारी सर्व प्रकारची वाहने, खासगी तसेच एसटी महामंडळाच्या बसेसला सदरचे दाेन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत रस्ता वाहतुकीस बंद राहील.

या कालावधीत धुळे तसेच चाळीसगावकडून येणारी वाहने मनमाड चाैफुली, गिरणा पूलमार्गे शहरात प्रवेश करतील. तसेच शहराबाहेर जाण्यासाठी याच मार्गाने जावे लागणार आहे. बसेसही याच मार्गाने बसस्थानकावर ये-जा करतील. नागरिकांनी बदल केलेल्या मार्गाचा प्रवासासाठी उपयाेग करावा, असे आवाहनही माेहारे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...