आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आठ घरांची 23 दिवसांत नव्याने उभारणी

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेल्डन नगर भागातील नवीन वस्तीत २५ नाेव्हेंबरला लागलेल्या आगीत आठ घरे जळून खाक झाली हाेती. घरातील संपूर्ण साहित्य बेचिराख झाल्याने कुटुंबियांच्या स्वप्नांचा चुराडा झाला हाेता. आपत्कालीन परिस्थितीत नेहमी सहकार्य करणाऱ्या जमियत उलमा -ए – हिंद संघटनेने जळालेली घरे पुन्हा नव्याने बांधून देण्याची घाेषणा केली हाेती. अवघ्या २३ दिवसांत घरांची बांधणी पूर्ण करत रविवारी (दि.१८) कुटुंबियांना जमियतचे अध्यक्ष व आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात आल्या.

शाॅर्टसक्रियमुळे आग लागून आठ घरे जळाली हाेती. पीडित कुटुंबीय माेलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत हाेते. आगीच्या घटनेनंतर जमियतच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली हाेती. त्यानुसार जमियतने सर्व आठ कुटुंबियांना नवीन घरे स्वखर्चातून बांधून देण्याचा निर्णय घेतला हाेता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करत घरे साकारली आहेत. आमदार मुफ्ती यांनी आठ कुटुंबप्रमुखांच्या हाती घरांची चावी साेपविली. घरांच्या उभारणीसाठी झालेला खर्च जमियतने स्वत:च्या फंडातून केला आहे. गरीब कुटुंबियांचा संसार पुन्हा फुलल्याचा आनंद असल्याची भावना आमदार मुफ्तींनी व्यक्त केली. नागरिकांनी जमियतच्या पदाधिकाऱ्यांचा गाैरव करून आभार मानले. याप्रसंगी जमियतचे मालिक बकरा, माैलाना इम्तियाज इकबाल, अनिस फलाई, फकिर माेहंमद, माैलाना मुख्तार जमाली, माैलाना जहिर मिल्ली उपस्थित हाेते.

यांना मिळाली नवीन घरे
आगीत जैद अहमद माेहंमद अय्यूब, माेहंमद सलीम, मुनावर अली ताैफिक अहमद, माेहंमद अय्यूब माेहंमद हनीफ, अली हसन लाल माेहंमद, नबी हसन लाल माेहंमद, माेहंमद हनीफ अब्दुल मजीद, नजीर सरदार खान.

बातम्या आणखी आहेत...