आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:38 ग्रामपंचायतींत नवीन चेहऱ्यांना सरपंचपदी संधी

सटाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागले आहेत. बहुतांशी ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नवीन चेहऱ्यांना थेट सरपंचपदी संधी दिली आहे. ३८ ग्रामपंचायतींमध्ये यावेळी सरपंचपदी नवीन चेहरा असणार आहे. तालुक्यातील तीन ग्रामपंचायती यापूर्वीच अविरोध झालेल्या आहेत. पक्षीय पातळीवर भाजपने ४१ पैकी तब्बल ३७ तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही ४१ पैकी २६ ठिकाणी आपले उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे.

आराई ग्रामपंचायतीत दिलीप सोनवणे यांचा तीस मतांनी विजय झाला तर जायखेडा सरपंचपदाच्या निवडणुकीत शोभा गायकवाड यांचा ५३ मतांनी विजय झाला. तळवाडे दिगरच्या सरपंचपदासाठी काटेकी टक्कर झाली असून यात जनाबाई शंकर पवार यांचा २६ मतांनी विजय झाला आहे.

तळवाडे दिगर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत दिलीप ठाकरे यांचा अवघ्या एका मताने विजय झाला आहे. मोरेनगरच्या सरपंचपदी वैशाली देवरे यांचा२६ मतांनी विजय झाला असून त्यांनी प्रतिभा अहिरे यांचा निसटता पराभव केला. गोराणेच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पुतण्याने चुलत्याचा पराभव केला असून डॉ. दिनेश देसले ५४ मतांनी निवडून आले आहेत. डांगसौंदाणे ग्रामपंचायतीवर सिंधुबाई निकम ३९५ मतांनी सरपंचपदावर निवडून आल्या आहेत. मुंजवाडच्या सरपंचपदी यशश्री जगताप निवडून आल्या असून त्यांना १७१० मते मिळाली आहेत. माळीवाडेच्या सरपंचपदी केशव गवळी निवडून आले आहेत.

चौंधाणे ग्रामपंचायतीवर विमल मोरे ३५८ मतांनी निवडून आल्या आहेत. विमल मोरे यांना ११०० तर जयश्री मोरे यांना ७४२ मते मिळाली. चौगावच्या सरपंचपदी सुलकणबाई पांडुरंग पवार निवडून आल्या. तिळवणच्या सरपंचपदी विमलबाई बोरसे, आसखेडा ग्रामपंचायतीवर थेट सरपंचपदावर दीपक कापडणीस निवडून आले आहेत. वनोली ग्रामपंचायत सरपंचपदी शरद भामरे यांनी बाजी मारली असून त्यांनी संजय भामरे यांचा २६४ मतांनी पराभव केला. टेंभे खालचे येथील सरपंचपदी बेबिबाई चव्हाण निवडून आल्या असून गोळवाडच्या सरपंचपदासाठी गंगूबाई मोहन अहिरे यांनी विजय मिळविला आहे. कातरवेलच्या सरपंचपदावर सुवर्णा सुनील चव्हाण २५७ मतांनी विजयी झाल्या आहेत. मुंगसे ग्रामपंचायत सरपंचपदी भगवान पिंपळसे यांनी बाजी मारली आहे.

तांदूळवाडी ग्रामपंचायतीवर आशाबाई सुभाष भामरे निवडून आल्या असून मुल्हेर सरपंचपदी निंबा भानसे यांनी विजय खेचून आणला आहे. वटारच्या सरपंचपदावर मछिंद्र खैरनार निवडून आले आहेत. मळगाव तिळवणच्या सरपंचपदावर योगेश ठोके यांची निवड झाली असून डोंगरेजच्या सरपंच म्हणून बापू खैरनार निवडून आले आहेत.

औंदाणेंच्या सरपंचपदी भरत पवार यांनी बाजी मारली आहे. खिरमाणीच्या सरपंचपदी बाबाजी भदाणे, निकवेलच्या सरपंचपदी दीपक मोरे, वाघंबा सरपंचपदी सुशीला सूर्यवंशी, आनंदपुरच्या सरपंचपदी रोहिणी पवार, तळवाडेच्या सरपंचपदी दिनेश गायकवाड, वरचे टेंभे सरपंचपदावर किरण वाघ, मानूरच्या सरपंचपदी पंडित चैत्राम मोरे, देवठाण दिगरच्या सरपंच सोनी ठाकरे तर जाखोडच्या सरपंचपदावर शंकर पवार यांनी बाजी मारली आहे.

बातम्या आणखी आहेत...