आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकऱ्ही येथील तीन महिन्यांपूर्वी ग्रामसेविका एस. ए. बनकर यांची तक्रारींवरून बदली झाली. त्यांच्या जागेवर एस. जे. कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ते आल्यापासून गावात एकही विकासकाम झाले नसल्याचा ग्रामस्थांनी आराेप केला हाेता. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करून नवीन कार्यक्षम ग्रामसेवक नियुक्त करावे, या मागणीसाठी सरपंचांसह ग्रामस्थ स्मशानभूमीत उपोषणास बसले होते. दरम्यान, नांदगावचे विस्तार अधिकारी विजय ढवळे यांनी भेट देऊन ग्रामसेवकाची बदली केली असून नवीन ग्रामसेवक शुक्रवारपासून रुजू होतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
सरपंच अनिल डोंगरे, बाळू दराडे, आप्पा राख, वाल्मीक सगळे, जनार्दन लहिरे, पोपट घुगे, दत्तूपंत घुगे, शंकर राख, नंदू डोंगरे, वाल्मीक सानप, वाल्मीक घुगे, पंढरीनाथ काकड, सुधाकर घुगे, देवराम ढाकणे, सुदाम दराडे, बाळू उगले, दशरथ लहिरे, वाल्मीक लहिरे, लक्ष्मण काकड, विष्णू डोमडे, अशोक राख आदी ग्रामस्थ गावच्या स्मशानभूमीत गुरुवारी उपोषणास बसले होते.
सदरची मागणी मान्य झाल्याने विस्तार अधिकारी विजय ढवळे, किशोर लहाने, राजू सांगळे, पंकज जाधव, दत्तू थेटे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन हे उपोषण स्थगित करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.