आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पोषण आहार:स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कामे सांगितली जाणार नाहीत

नांदगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांना स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कामे सांगितली जाणार नाहीत, असे आश्वासन गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर नांदगाव तालुका पोषण आहार समितीने उपोषण मागे घेण्यात आले.

पोषण आहार मदतनीसांना महिन्याला पंधराशे रुपये या अल्प मानधनावर काम करावे लागत असल्याने आशा वर्करप्रमाणे मानधन मिळावे या प्रमुख मागणीसह पोषण आहार बनविणाऱ्या महिलांना स्वयंपाक तयार करण्यासोबत शाळेतील इतर कामे सांगितली जात असल्याने पोषण आहार समितीच्या सदस्या सोमवारी येथील प्रशासकीय संकुलाच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसल्या होत्या.

मानधनात वाढ करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जात असल्याने तुमची मागणी वरिष्ठांकडे पोहाेचविण्यात येईल आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना मदतनीसांना इतर कामे न सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात विजय दराडे, संगीता सोनवणे, आशा काकळीज, सरला मोढे, शोभा भोसले, नफिसा शेख, बेबीबाई शिंदे, संगीता मोकळ, संगीता गुंजाळ, भारती देवकर, शाहीन काझी, ललिता खैरनार, लता बोरसे, संगीता चांदवे, रंजनाबाई पगार, जयश्री सोनवणे, सुमनबाई पगार, कुसुमबाई मगर, अनिता पालवे, लीलाबाई राठोड, भारती बोरसे, भारती औशीकर, सुनीता मोरे आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...