आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथ‎:येवल्यात उपस्थितांना‎‎ तंबाखूमुक्तीची शपथ‎

येवला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक कर्करोग दिनानिमित्त‎ येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या‎ वतीने शनिवारी शहरातून जनजागृती‎ रॅली काढण्यात आली. कर्करोग‎ टाळण्यासाठी तंबाखूजन्य‎ पदार्थापासून दूर राहावे, असा संदेश‎ देणारे फलक हाती घेत या रॅलीत‎ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी‎ सहभागी झाल्या होत्या.‎ कर्करोगामध्ये बहुतांशी कर्करोग‎ हे मुखाचे होत असतात.

यामध्ये‎ तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट‎ यांच्यामुळे मुखाचे कर्करोग होत‎ असतात. तसेच महिलांमध्ये स्तनाचे‎ कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.‎ भारतामध्ये पुरुषांमध्ये कर्करोगाचे‎ प्रमाण अधिक असून कर्करोग‎ नियंत्रणासाठी अनेक संस्था कार्यरत‎ आहेत.

तरी देखील नशा‎ करण्यासाठी पुरुष व महिला तंबाखू,‎ गुटखा यांचे सेवन करतात, त्यामुळे‎ कर्करोगाचे प्रमाण वाढले असून‎ यावर नियंत्रण करण्यासाठी‎ जनजागृती महत्त्वाची आहे. ही बाब‎ लक्षात घेऊन जागतिक कर्करोग‎ दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय व‎ नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त‎ विद्यमाने शनिवारी येवला शहरात‎ जनजागृती रॅलीचे आयोजन‎ करण्यात आले होते.

येवला‎ उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात‎ उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ‎ देण्यात आली.‎ याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या‎ वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा‎ कुप्पास्वामी, डॉ. शरद‎ कातकाडे,मुख्य परिचारिका श्रीमती‎ चंद्रात्रे यांच्यासह नर्सिंग कॉलेजचे‎ प्राचार्य,शिक्षक व विद्यार्थी मोठया‎ संख्येने उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...