आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अपर अधीक्षकांचे पथक,नई बाेतल में पुरानी शराब

मालेगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपर पाेलिस अधीक्षकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. अवैधधंद्यांवर कारवायांसाठी त्यांनी नवीन पथक कार्यरत केल्याची माहिती आहे. मात्र, पथकात पूर्वीच्याच कर्मचाऱ्यांचा समावेश दिसत आहे. यातील काही कर्मचारी हे भ्रष्ट आहेत. त्यामुळे अपर अधीक्षकांचे पथक म्हणजे ‘नई बाेतल में पुरानी शराब’ असल्याची गंभीर टीका करत पथकात स्वच्छ प्रतिमेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, अशी अपेक्षा माजी आमदार आसिफ शेख यांनी व्यक्त केली आहे.

तत्कालीन अपर अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी बदली आदेश येताच विशेष पथक बरखास्त केले हाेते. मात्र, अपर पाेलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पुन्हा याच कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश केल्याची चर्चा असल्याने शेख यांनी साेमवारी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून भूमिका मांडली. गुन्हेगारी तसेच अवैध धंदे राेखण्यासाठी पाेलिस उपअधीक्षक व अपर अधीक्षक हे विशेष पथक गठित करतात. हा त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे. परंतु, पूर्वीच्या विशेष पथकातील काही कर्मचाऱ्यांची भ्रष्ट प्रतिमा हाेती.

त्या कर्मचाऱ्यांविराेधातील पुरावे आपल्याकडे आहेत. अपर अधीक्षक भारती यांच्या नियुक्तीचे राष्ट्रवादीने स्वागतच केले आहे. भारती यांना खरंच शहर गुन्हेगारी व अवैधधंदे मुक्त करायचे असेल. जनमानसात पाेलिसांची प्रतिमा चांगली निर्माण करायची असेल तर विशेष पथकात निष्कलंक कर्मचाऱ्यांना संधी द्यावी, अन्यथा जनतेमध्ये अधिकाऱ्यांविषयी चुकीचा संदेश जाईल, असेही शेख यांनी स्पष्ट केले.

पथकाची कामगिरी दमदार
तत्कालीन अपर अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने दाेन वर्षांत दमदार कामगिरी केली. मालेगावसह कार्यक्षेत्रातील मनमाड, येवला, सटाणा, नांदगाव, चांदवड भागातील जुगार, मटका, अमली पदार्थ विक्री, शस्त्र जप्ती, गाेवंश जनावरांची वाहतूक आदी स्वरुपाच्या १०१ कारवाया करुन २१ गुन्हे उघडकीस आणले. २३३ आराेपींच्या मुसक्या आवळून तब्बल दाेन काेटी २१ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तक्रार आल्यास कारवाई
मागील पथकाद्वारे एक कारवाई केली होती. अवैध धंदे रोखण्यासाठी नवीन पथक कार्यरत करणार आहे. सूचनेनुसार पथक कारवाई करेल. काही तक्रारी प्राप्त झाल्या तर योग्य कारवाई केली जाईल. - अनिकेत भारती, अपर पोलिस अधीक्षक , मालेगाव

बातम्या आणखी आहेत...