आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवितहानी नाही:पिंपळगाव नजीकला ओम्नी कारने घेतला पेट

लासलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव व पिंपळगाव नजीकला जोडणाऱ्या शिवनदीवरील पुलावरून जात असलेल्या एका ओम्नी कारला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेले नाही. यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.ब्राह्मणगाव येथील भाजीपाला व्यावसायिक सुनील पगारे यांच्या मालकीची ओम्नी कार (एमएच १५ बीएक्स ०६५८) या गाडीने पगारे कुटुंब लासलगाव व पिंपळगाव नजीकला जोडणाऱ्या शिवनदीवरील पुलावरून जात असताना या कारने अचानक पेट घेतला.

कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने व कुटुंबातील इतर सदस्यांनी कारच्या बाहेर उड्या घेतल्या. कारला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक युवकांनी मिळेल त्या ठिकाणाहून पाण्याच्या बादल्या आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपनिरीक्षक लहानू धोक्रट, सागर आरोटे हे तत्काळ घटनास्थळी हजर झाले व पाण्याचा टँकर बोलावून आगीवर नियंत्रण मिळविले.

बातम्या आणखी आहेत...