आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:इंदूर-पुणे राज्य महामार्गावरील ; मनमाडला अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर-पुणे राज्य महामार्गावरील अनकवाडे शिवारात ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाआहे. मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अनकवाडे शिवारात सोमवारी सायंकाळच्या सुमारास येवल्याहून मनमाडकडे येणाऱ्या ट्रकने (टीएन ५२ एल ७४००) मनमाडकडून येवल्याकडे जाणाऱ्या दुचाकी (एमएच १५ जीझेड १७४८) ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार कार्तिकेय जितेंद्र चव्हाण (२६, रा. भडगाव, ता. चांदवड) याला गंभीर दुखापत झालीआहे.

त्याला उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यातआलेआहे. याप्रकरणी किशोर परशुराम चव्हाण यांनी मनमाड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यातआला असून पुढील तपास पोलिस कर्मचारी संतोष सुरासे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...