आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपघात:साक्री-शिर्डी महामार्गावर; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

सटाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री-शिर्डी महामार्गावर शहराजवळील यशवंतनगर भागात दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री साडेअकरा वाजता घडली. अपघात घडल्यानंतर स्थानिक युवकांनी शासकीय रुग्णवाहिकेला (१०८) फोन केला असता घटनास्थळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तत्काळ हजर झाली. मात्र, अपघातात मृत झालेल्या युवकाचे वडील स्वतः रुग्णवाहिकेचे चालक निघाल्याने पोटच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळी बापाचा आक्रोश पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.

सागर श्रावण खैरनार (२२ रा. वासोळ, ता. देवळा) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो सटाणा शहरातील सिम्स हॉस्पिटल येथे नोकरी करत होता. त्याचे वडील श्रावण खैरनार हे सटाणा ग्रामीण रुग्णालयात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर चालक आहेत. सटाणा शहर व परिसरात होणाऱ्या अपघातांमधील जखमी रुग्णांना रुग्णालयात पोहोचविणाऱ्या खैरनार यांना त्यांच्याच मुलाच्या अपघातात घटनास्थळी मदत करण्याची वेळ आली. मात्र, अपघातात त्यांचा मुलगा सागर गंभीर जखमी झाल्याने उपचारांच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. शेवटी खासगी रुग्णवाहिका बोलावून सागरचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. सटाणा पाेलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...