आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहालाखीच्या परिस्थितीवर मात करत जिद्द व चिकाटीने राहुल कैलास गवळी या तरुणाने विद्यूत पारेषण कंपनीत सहअभियंता वर्ग १ पदाला गवसणी घातली आहे. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व हुतात्मा वाचनालयातर्फे बुधवारी सकाळी हुतात्मा स्मारक येथे छोटेखानी कार्यक्रमात गौरव करत राहूलचे कौतुक केले. राहूलचे वडील कैलास गवळी हे दूध विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी कर्ज काढून राहुुलला इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी अमरावती येथे पाठविले होते. राहुलने शिक्षण पूर्ण करत हुतात्मा स्मारक वाचनालयात दोन वर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे अनेकदा अपयश पदरी पडले तरी खचून न जाता त्याने आपले प्रयत्न कायम ठेवले होते. अखेर त्याला महाराष्ट्र राज्य विद्यूत पारेषण कंपनीत सहअभियंता पदावर नोकरी मिळाली आहे. मालेगावकर समितीचे पदाधिकारी निखिल पवार व मनपा प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर यांच्या हस्ते राहुलचा गौरवा करण्यात आला. राहुलने मनोगत व्यक्त करत आपल्या खडतर वाटचालीची माहिती दिली. याप्रसंगी देवा पाटील, प्रवीण चौधरी, सुशांत कुलकर्णी, सलाम कुरेशी, सजन पाटील, समाधान अहिरे, तुषार पाटील, जुबेर मजिद पिंजारी, जयेश वाघ आदी उपस्थित होते.
वाचनालयाचा विद्यार्थ्यांना लाभ, सुविधांची मागणी
महापालिकेने टिळकनगर भागातील हुतात्मा स्मारक येथे वाचनालय सुरू केले आहे. हे वाचनालय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. वाचनालयाच्या माध्यमातून अभ्यास करत बहुतांश विद्यार्थी पोलिस, सैन्यदल, राज्य उत्पादन शुल्क विभाग, मंत्रालयाच्या विविध पदांवर विराजमान झाले आहेत. या वाचनालयात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निखिल पवार यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.