आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:लाच घेणाऱ्या तिघांना एक दिवसाची पोलिस कोठडी

बोरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केलेल्या कामाचे पैसे काढून देण्यासाठी दोघा शासकीय अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजारांची लाच घेताना बुधवारी रंगेहाथ अटक केली. या लाचखोर कर्मचाऱ्यांचा नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या विविध विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचे मानधन काढून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाचे तालुका व्यवस्थापक प्रमोद बाळासाहेब पाटोळे (३७) व विभाग समन्वयक विलास मोतीराम खटके (३८) यांच्यासह खासगी व्यक्ती यादव मोतीराम गांगुर्डे (रा. चिंचपाडा, हट्टी) यांना १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक झाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक साळुंखे व इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला होता. त्यांच्यावर सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...