आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:जन विकास आघाडीचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण; शहरातील रस्ते निकृष्ठ झाले असून सुरू असलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ मे, महाराष्ट्र दिनी नगर पंचायत समोर जन विकास आघाडीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

मालेगाव शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून पाणी पुरवठा जुन्याच यंत्रणेद्वारे होत आहे. तोही अपुरा व अनियमित होतो. पाणी कर भरूनही वेळेवर पाणी मिळत नाही. नगर पंचायत कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शहरातील काम होण्यास विलंब होत आहे.

ती पदे रिक्त पदे भरण्यात यावी. भूखंडाच्या नोंदी होत नसल्याने शासनाच्या घरकुल योजनेपासून अनेक जण वंचित आहेत. शहरात लाखो रुपये खर्चून वृक्ष लागवड केली आहे. मात्र त्यात भ्रष्टाचार झाला. त्यातील दहा टक्केच झाडे जगली. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. शहरातील रस्ते निकृष्ठ झाले असून सुरू असलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी.

यासह आदी मागण्या उपोषणातून करण्यात आल्या. १५ मेपर्यंत समस्यांचे निराकरण झाले नाही तर आंदोलन छेडण्यात येतील, अशा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनाला अमान मालवी, भागवत बळी, मोहम्मद जफर, रामदास काटेकर, प्रमोद सोमाणी, किशोर महाकाळ, रामदास बळी, गणेश राऊत, पप्पू कुटे, अमोल बळी, विठ्ठल बळी, किशोर शिंदे, स्वानंद बळी, अतिश बोकन, योगेश मुंढरे, सोनू अहिर, अमोल पखाले उपोषणाला बसले होते. गजानन देवळे यांनी दिली भेट : उपोषणाला गजानन देवळे व मित्र मंडळाने भेट दिली. तसेच मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी भेट देवून समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले

बातम्या आणखी आहेत...