आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांस्यपदके:शालेय राज्य वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या मुलींना एक सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्यपदके

मनमाड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुडाळ येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी करत एक सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्यपदके मिळविली.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित राज्यस्तरीय शालेय १७ व १९ वर्षे मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे करण्यात आले. महाराष्ट्रातील आठ विभाग व राज्य क्रीडा प्रबोधिनीच्या १६० खेळाडूंनी तब्बल दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर होणाऱ्या स्पर्धेत कमालीची चुरस निर्माण केली.

येथील जयभवानी व्यायामशाळेच्या व कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या साक्षी भाऊसाहेब वानखेडे हिने ५९ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. ५५ किलो वजनी गटात पूजा श्याम वैष्णव हिने रौप्यपदक पटकावले. छत्रे विद्यालयाच्या आनंदी विनोद सांगळे हिने ७१ किलो वजनी गटात पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक, श्रावणी विजय पुरंदरे हिने ४९ किलो वजनी गटात कांस्यपदक, करिष्मा रफिक शाह हिने ७६ किलो वजनी गटात कांस्यपदक, सरस्वती विद्यालयाच्या पूर्वा दीपक मौर्य व छत्रे विद्यालयाच्या दिव्या उपेंद्र सोनावणे, श्रावणी वाल्मीक सोनार या खेळाडूंनी चतुर्थ क्रमांक मिळविले.

त्यांना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रविण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले. जयभवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, प्राचार्य डॉ. अरुण पाटील, क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव, छत्रे विद्यालयाचे पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जी. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर.एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका एस. एस. पोतदार यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...