आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:पिकअप-दुचाकीच्या धडकेत एक ठार; दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी

रगाणा, बोरगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा ते उंबरठाण रस्त्यावरील प्रतापगड फाटा येथे शुक्रवारी सुरगाण्याकडे धरमपूर येथून आंबे घेऊन येणारी पिकअप (एमएच ४८ टी ८७२०) व सुरगाण्याकडून उंबरठाणकडे जाणारी दुचाकी (एमएच १५ डीव्ही १७४७) यांच्यात सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अपघात झाला. यात दुचाकीचालक भाऊराव परशुराम शेवरे (४१, रा. कोठुळा, ता. सुरगाणा) हे जागीच ठार झाले.

पाठीमागे बसलेले कृष्णा काशीराम पवार (३१), सुरेश काशीराम पवार (४०, रा. कोठुळा) हे दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सुरगाणा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...